(जून २६, २०१०)
पोरांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की इथे सर्वांना भटकायचे वेध लागतात. अर्थात तेही ठीकच आहे म्हणा कारण उन्हाळ्याच्या ह्याच तीन चार महिन्यात मनसोक्त भटकायला मिळतं. मग आहेच थंडीत बाहेरचा पांढरा एकसुरी रंग बघत दिवस रात्र घालवणं!
एप्रिल महिन्यांपासूनच छोट्या छोट्या गावांच्या जत्रा सुरु होतात. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवत असतात. त्यापैकीच 'हॉवेल' हे एक छोटंसं गाव. त्यांच्या 'हॉट एअर बलून फेस्टीवल' बद्धल बरंच ऐकलं होतं पण घराच्या अवघ्या तासा-दोन तासांच्या अंतरावर असूनही जाणं मात्र झालं नव्हतं. मागच्याच आठवड्यात नायगारादर्शन करून आलेलो त्यामुळे पाकिट तसं अशक्तच होतं म्हणून मग ह्या विकांतचा ("विकांत" हा काही मराठी संस्थळांनी मराठी भाषेला प्रदान केलेला अनमोल शब्द) कार्यक्रम म्हणून हॉवेल ला जाण्याचं निश्चित केलं.
शुक्रवारी काही मित्रांबरोबर 'काव्य-शास्त्र-विनोद' ;-) करण्यासाठी भेटलो होतो, तेव्हा बोलुन गेलो. मग सगळ्यांनीच इंट्रेस्ट दाखवला.. आणि फटाफट प्रोग्रॅम बनला. आगोदर "सक्काळी लवकर ७ ला निघुया. त्यांचं डाउनटाउन फिरुया" म्हणणारे लोक हळूहळू ('का-शा-वि' बराच वेळ चालू राहिल्यामुळे सकाळी उठायला उशीर होईल हे जाणवल्यामुळे..) "दुपारी जेवण झाल्यावर निघू आरामात.. नाहीतरी बलून फेस्टीवल संध्याकाळी सहाला आहे" म्हणायला लागले. मग कोण कोण एकत्र येणार वगैरे ठरलं आणि सभा बरखास्त झाली. मंडळी आपापल्या घरी परतली.
त्यांच्यापैकी किती जणं खरोखर उगवणार आहेत ह्याबद्धल मला जरा शंका होतीच त्यामुळे आम्ही (म्हणजे मी, ही आणि छोकरा) आमच्या ठरलेल्या प्लॅन प्रमाणेच दोन वाजता घरातून निघालो. आणि आश्चर्य म्हणजे आम्ही तिथे पोहोचेतोवर बरचसं मित्रमंडळ (आणी त्यांच्या मंडळी) तिथे पर्फेक्ट त्याच दरम्यान पोचलं. (शिकलेला धडा: पुन्हा कधी कुठे एका ठरावि़क ठिकाणी भेटायचं असेल तर आदल्या दिवशी 'का-शा-वि' आणि भेटायची नक्की वेळ _न_ ठरवणे.)
असो... मी लांबण जरा जास्तच लावलंय. तर आता थेट फोटोंकडे जातो.
हवाई-उड्या (स्काय्-डायविंग) व राष्ट्रगीताने प्रोग्रॅमची सुरुवात झकास झाली..
(इथे विडियो चढवायचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. दिसत असेल अशी आशा आहे. नसेल तर सांगा)